भंडारा : प्रियकराने केला प्रियसीचा गळा आवळून खून

Bhandara Crime News | मोगरा येथील घटना, प्रियकराचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
Bhandara Crime News
मृत महिला पुष्पा बनकरPudhari Photo
Published on
Updated on

भंडारा - लाखनी तालुक्यातील मोगरा येथे प्रियकराने विधवा प्रियसीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना आज शुक्रवारी (ता. २१) ला उघडकीस आली. घटनेनंतर प्रियकर आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात येवून घडलेला प्रकार सांगून आत्मसमर्पण केले आहे. पुष्पा ज्ञानेश्वर बनकर असे मृत महिलेचे नाव असून खुशाल पडोळे (वय ३० ) असे मारेकरी प्रियकराचे नाव आहे. खून कोणत्‍या कारणाने झाला याचा लाखनी पोलीस शोध घेत आहेत.

मृतक पुष्पा बनकर ही भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या २ मुलांचा सांभाळ करीत होती. गेल्या ७-८ वर्षापूर्वी तिच्या पतीने शारीरिक व्याधीला कंटाळून आत्महत्या केली होती. आज शुक्रवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास आरोपी खुशाल पडोळे याने तिला शेतशिवारातील नाल्याकडे बोलावले. व नंतर आरोपीने दोरीने गळा आवळून तिचा खून केला. लगेच त्याने पोलीस स्टेशन गाठत घडलेली हकीकत सांगितली व केलेल्या खुनाची कबुली दिली. घटनास्थळी लाखनी पोलिसांची चमू तसेच फोरेन्सिक चमू पोहचली असून तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहचले असून घटनेसंदर्भातील पुरावे गोळा करण्याचे काम सुरु होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news