

भंडारा : दोन दिवसांपूर्वी भंडारा शहरात आपल्या मुलीच्या समवयस्क मैत्रिणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी दिली. याविरोधात गुरूवारी (दि.६) पँथर हल्लाबोल ब्रिगेडच्या वतीने जिल्हा न्यायालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने सदर आरोपी वकिलाचा जामीन ११ मार्चपर्यंत थांबविला. सोबतच त्याला एक दिवसाची पोलिस कोठडीचे आदेश दिले. तसेच पिडीतेची बाजू मांडण्यासाठी चार सरकारी वकिलांची नियुक्ती केली.
विजय रेहपाडे या वकिलाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली. परंतु, त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करायला हवी होती. परंतु आरोपीने प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणावरून रुग्णालयात दाखल झाला. हा मुद्दा प्रकाशात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात रवानगीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पिडितेला योग्य न्याय मिळावा, सरकारी वकील बदलण्यात यावा, सदर खटला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात चालविण्यात यावा, या मागण्यासांठी जिल्हा न्यायालयासमोर काळ्याफिती बांधून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने चार सरकारी वकिलांची नियुक्ती केली. ११ मार्चपर्यंत आरोपीचा जामीन नाकारत एक दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली.
या आंदोलनाचे नेतृत्व पँथर परमानंद मेश्राम यांनी केले. यावेळी अचल मेश्राम, प्रिया शहारे, हेमा गजभिये, नाशिक चवरे, संजय रामटेके, पिंकी उके, चंद्रशेखर खोब्रागडे, कीर्ती गणवीर, सचिन गेडाम, युवराज रामटेके, हंसराज वैद्य, सुरज भालाधरे, हेमंत गजभिये, सचिन गेडाम, संजय रामटेके, श्रीराम बोरकर, मैत्रीय मेश्राम, तथागत फुले, प्रणिता मेश्राम, डेविड भालाधरे, श्रीराम गणेर, संगीता बागडे, जयदीप बागडे, मंजू गजभिये, संगीता बागडे, आशिष गोस्वामी , त्र्यंबक घरडे हे उपस्थित होते.