Bhandara accident : अनियंत्रित ट्रेलरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Bhandara road accident: पालगावजवळील घटना, विद्युतखांबासह रोटाव्हेटरचा चुराडा
Bhandara Accident News |
Bhandara accident : अनियंत्रित ट्रेलरच्या धडकेत युवकाचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

Trailer hits youth Bhandara

भंडारा : भरधाव अनियंत्रित ट्रेलरच्या जबर धडकेत गंभीररित्या जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भंडारा-पवनी राज्यमहामार्गावर पालगाव बस स्टॉपशेजारी रविवारी (दि.8) रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. सुशांत नंदलाल गणवीर (28) असे मृत तरुणाचे नाव आहे.

बसस्थानकावरून घरी परत जात असताना मागून आलेल्या MH 40 CM 2785 क्रमांकाच्या ट्रेलरने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की सुशांतच्या डोक्याला आणि उजव्या पायाला खोल जखमा होऊन तो तत्काळ बेशुद्ध पडला. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. चालक प्रमोद मोहतुरे यांनी गंभीर जखमी सुशांतला जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे हलविले; परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार ट्रेलर मर्यादेपेक्षा जास्त वेगात होता. ट्रेलर चालक हा दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर सुशांत याला धडक देत रस्त्यालगत घुसला. यावेळी तेथे ठेवलेला रोटाव्हेटरचा चुराडा करीत वीज खांबाला धडक देत हा ट्रेलर थांबला. सुदैवाने यावेळी तिथे कोणी नव्हते. अन्यथा ट्रेलरखाली येवून आणखी जीवितहानी तसेच शेजारच्या घरात घुसून तीव्र दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी लगेच धाव घेत जखमी सुशांतला उपचारासाठी हलविले मात्र, त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कारधा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून वाहनचालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली जात असून, सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांच्याद्वारे अपघाताचे मूळ कारण ठरवले जाणार आहे.

Bhandara Accident News |
Ramdas Kadam | उद्धव- राज एकत्र आले तरी, 'ठाकरे ब्रँड' आमच्याकडेच : रामदास कदम

दरम्यान, पालगाव-पवनी तसेच महामार्गावरील अपघातांचे सत्र काही केल्या थांबण्याचे दिसत नाही. जून महिन्यात अवजड वाहने आणि वाढता वेग यांमुळे जवळपास दररोजच किरकोळ वा गंभीर घटनांची नोंद होत आहे. सुशांत गणवीरच्या अकाली निधनाने पालगावात शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांचा आधार हरपला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news