Bhandara Accident | फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला चिरडले

नागपूर नाका परिसरात अपघात
Bhandara Accident | फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला चिरडले
Published on
Updated on

भंडारा : नागपूर नाका परिसरात एका भरधाव दुचाकीने फुटपाथवर झोपलेल्या अज्ञात व्यक्तीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ११ जून रोजी रात्री ११:१५ च्या सुमारास ही  घटना घडली.

दुचाकीस्वार स्वप्नील चंद्रकांत हुलके (२४) रा. बेला  एमएच ४० सीएच ५६८३ क्रमांकाची दुचाकी वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. नागपूर नाका परिसरात नियंत्रण सुटल्याने त्याने फुटपाथवर झोपलेल्या एका अज्ञात व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो अज्ञात व्यक्ती गंभीर जखमी झाला.

त्यानंतर त्याला तातडीने सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. अपघातात दुचाकीस्वार स्वप्नील हुलके आणि त्याच्या सोबत असलेला अन्य एक जण सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी चालक स्वप्नील हुलके याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयाच्या शवागारात सुरक्षित ठेवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मयताची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news