भजनी मंडळींचे वाहन नाल्यात कोसळले, १३ जखमी, २ मुली वाहून गेल्या

Bhandara News | साकोली तालुक्यातील घटना
Bhandara News
भंडारा- भजनी मंडळींना घेऊन जाणारे वाहन नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. (File Photo)
Published on
Updated on

भंडारा; पुढारी वृत्तसेवा

भजनी मंडळींना घेऊन जाणारे वाहन नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास साकोली तालुक्यातील खांबा जांभळी येथे घडली.

भजनी मंडळींना घेऊन जाणारे एक मिनी मॅक्स वाहन पुलावरून नाल्यात कोसळून अपघात झाला. या घटनेत साधारणतः १३ इसम किरकोळ जखमी झाले आणि २ लहान मुली पाण्यात वाहून गेल्या आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळी तहसीलदार आणि नायब तहसीलदार, पोलीस उपस्थित आहेत. वाहून गेलेल्या मुलींचा शोध घेण्यात येत आहे.

Bhandara News
वय ४९, केले ७१ : योजनेचा लाभ घेण्यासाठी सरपंच बनल्या म्हाताऱ्या

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news