

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून एका महिलेने भंडारा बसस्थानकावर विष पिल्याची घटना घडली. या प्रकारानंतर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुर्देवाने तिचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. करिना अनिकेत लोखंडे (वय.21 रा. सुरगाव जि. नागपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
करिना पतीसोबत भांडण करुन माहेरी आली होती. या घटनेनंतर विवाहिता आपल्या प्रियकराच्या घरी गेली. प्रियकराच्या घरी एक दिवस थांबून ती भंडारा येथील बसस्थानकावर पोहोचली. रविवारी (दि.14) स्थानकावर तिने मध्यरात्रीच्या सुमारास तिने विष प्राशन केले. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तीन दिवसाच्या उपचारानंतर तिचा बुधवारी (दि.17) मृत्यू झाला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कुंभरे करत आहेत.