Road Accident Deaths | आठ महिन्यांत १४० जणांचा अपघाती मृत्यू

Black Spot Monitoring | ‘ब्लॅक स्पॉट’वर राहणार पोलिसांची नजर
Road Accident Deaths
आठ महिन्यांत १४० जणांचा अपघाती मृत्यूPudhari File Photo
Published on
Updated on

140 Deaths In 8 Months

भंडारा : जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर १४० जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून पोलिस विभागाने जिल्ह्यातील सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. अपघातांचे ब्लॅक स्पॉट्स निवडून, पोलिस पथक आता अशा ठिकाणांवर दर दुसऱ्या दिवशी दोन तास देखरेख ठेवणार आहे. याद्वारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग भंडारा जिल्ह्यातून जातो. सुमारे ६० किमी लांबीच्या या मार्गावर दररोज अपघात होतात. दररोज २० हजारांहून अधिक वाहने या मार्गावरून जातात. दुसरीकडे, इतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे जाळे पसरले आहे. जिल्ह्यात वाहतूक नियमांचे पालन न करणे हे अपघातांचे मुख्य कारण बनले आहे. हेल्मेट न घालणे, मद्यपान केल्यानंतर वाहन चालवणे, गाडी चालवताना सीट बेल्ट न लावणे, हे निष्काळजीपणा जीवघेणे ठरत आहेत.

Road Accident Deaths
Bhandara crime news: भंडारा हादरलं; भर चौकात चाकूने वार, दोघांचा मृत्यू; शहरात तणावपूर्ण शांतता

नागरी आणि प्रशासकीय सेवेतील कर्मचारीही नियमांचे उल्लंघन करण्यात अव्वल आहेत. परिणामी दररोज अपघात होतात आणि नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक कुटुंबांनी कुटुंबप्रमुख, तरुणांना गमावले आहे. त्यानंतर ही कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
या वर्षी जानेवारी ते ऑगस्टदरम्यान रस्ते अपघातात १४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Road Accident Deaths
Bhandara Accident | महिला मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू, २१ जखमी

हे अपघात रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी नवीन प्रयोग अंमलात आणला आहे. पोलिस विभाग सर्व प्रमुख मार्गांचे सर्वेक्षण करत आहे. या काळात पोलिस विभागाचे पथक दररोज सर्वाधिक अपघात होणाºया ब्लॅक स्पॉटची पाहणी करणार आहे. पोलिसांना पाहून वाहनचालक वेग नियंत्रित करतील आणि नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news