भंडारा : झुंजीत जखमी झालेल्या बिबट्यावर उपचार

भंडारा : झुंजीत जखमी झालेल्या बिबट्यावर उपचार
Published on
Updated on

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : दोन बिबट्यामध्ये झालेल्या झुंजीत एक बिबट्या गंभीर जखमी झाला. या बिबट्याचे रेस्क्यू करून त्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव उपचार व रेस्क्यू सेंटर येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. ही घटना साकोली वन विभागाअंतर्गत येणाऱ्या शिरेगावबांध परिक्षेत्रात घडली.

नवेगाव बांध अभयारण्यालगत असलेल्या या घटनास्थळी बिबट्या एका रस्त्याच्या पुलाखाली पाइपमध्ये असल्याची माहिती गोंदिया येथील आरआरयु पथकाला मिळाली. पथकाने घटनास्थळ गाठले. यावेळी सदर बिबट्या गंभीर जखमी असल्याची बाब समोर आली. याची माहिती आरआरयू पथकाने साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड यांना दिली.

माहिती मिळताच राठोड हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी राठोड यांनी गंभीर बिबट्याचे रेस्क्यू करण्यासाठी उप वनसंरक्षक राहुल गवई यांची परवानगी घेत वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात अडकविले. त्याची पाहणी केली असता बिबट्या गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. सदर रेस्क्यू पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर बिबट्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव उपचार व रेस्क्यू सेंटरला पाठविले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news