नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : नागपुरात सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी कुलर दुरुस्तीसाठी आलेल्या इलेक्ट्रिशियननं हा प्रकार केला. देवदास नामदेव वाघमारे असं आरोपीच नाव आहे.
देवदास वाघमारे (वय ६०) याने सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. चिमुकलीची आजी आणि आई दोघेही कामासाठी बाहेर गेले होते. यावेळी कुलर दुरुस्तीसाठी देवदास घरात आला होता. देवदासची वाईट नजर चिमुकलीवर गेली. तिला त्याने घरात आणले. आतून दार बंद केले. यानंतर या नरधमाने तिच्यावर अत्याचार केला.
कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. यानंतर देवदास कुलर दुरुस्त न करताच निघून गेला. चिमुकलीची आई आणि आजी संध्याकाळी घरी परतल्या. तेंव्हा चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आई आणि आजीने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.