चंद्रपूर जिल्ह्यात फडकले सुमारे ५ लक्ष झेंडे

चंद्रपूर जिल्ह्यात फडकले सुमारे ५ लक्ष झेंडे
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात एकूण 5 लक्ष 9 हजार 205 झेंडे फडकविण्यात आले. यात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची घरे, शासकीय व निमशासकीय इमारती तसेच इतर खाजगी कार्यालय व दुकानांचा समावेश आहे.

जिल्ह्यात फडकविण्यात आलेल्या 5 लक्ष 9 हजार 205 झेंड्यांमध्ये एकूण घरांची संख्या 4 लक्ष 82 हजार 675 आहे. यात ग्रामीण भागातील घरे 3 लक्ष 12 हजार 484 तर शहरी भागातील घरे 1 लक्ष 70 हजार 194 आहे. तसेच शासकीय आणि निमशासकीय एकूण इमारती 4,766 असून यात ग्रामीण भागातील 3,798 आणि शहरी भागातील 908 इमारती, तर जिल्ह्यातील खाजगी कार्यालय आणि दुकानांची एकूण संख्या 21,534 आहे. यात ग्रामीण भागातील 1,332 आणि शहरी भागातील 21,534 खाजगी कार्यालय आणि दुकानांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 15 तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण 3 लक्ष 17 हजार 614 झेंडे फडकविण्यात आले. यात शासकीय निमशासकीय इमारती 3,798 घरांची संख्या 3 लक्ष 12 हजार 484 तर इतर खाजगी कार्यालय आणि दुकानांची संख्या 1,332 आहे. तसेच चंद्रपूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा व सात नगरपंचायती क्षेत्रातील शहरी भागात एकूण 1 लक्ष 91 हजार 591 झेंडे फडकविण्यात आले. यात शहरी भागातील शासकीय निमशासकीय इमारतींची संख्या 968, घरांची संख्या 1 लक्ष 70 हजार 191 आणि इतर खाजगी कार्यालय व दुकानांची संख्या 20 हजार 432 आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news