शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या वाहनावर गोळीबार

वर्चस्वाच्या वादात हल्ला झाल्याची चर्चा
Shiv Sena Shinde group's district chief Gopal Arbat fired on his vehicle
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या वाहनावर गोळीबारFile Photo
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा

शिवसेना शिंदे गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट यांच्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि.३०) मध्यरात्री दर्यापूर ते वलगाव मार्गावर ही घटना घडली. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत हा गोळीबार झाल्याची चर्चा आहे. दरम्यान या घटनेत गोपाल अरबट यांना कुठलीही दुखापत झाली नाही. अरबट यांच्या वाहनावर संशयित आरोपींनी तीन राऊंड फायर केल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोपाल अरबट हे सोमवारी रात्री वलगाव ते दर्यापूर मार्गावरून कारने जात होते. यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सुदैवाने अरबट यांना कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या कारच्या काचा फुटल्या आहेत.

फॉरेन्सिक टीम दाखल 

दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर ती इनोव्हा गाडी वलगाव पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली आहे. येथे फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून, त्यांच्याकडून तपास केला जात आहे. हा हल्ला पक्षांतर्गत वर्चस्वाच्या लढाईतून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस सखोल तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी दिली.

अमरावतीत शिवसेना शिंदे गटाचे गोपाल अरबट आणि अरुण पडोळे असे दोन जिल्हाध्यक्ष आहेत. या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. त्यामुळे अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरूनच आपल्या गाडीवर गोळीबार झाला अशी तक्रार गोपाल अरबट यांनी पोलिसात केली आहे. यापूर्वीही गोपाल अरबट आणि अरुण पडोळे यांच्यामध्ये वर्चस्वावरून अनेकदा वाद झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news