Amravati Accident | मोर्शी - चांदूरबाजार मार्गावर दोन पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक; १ ठार

जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल
Morshi Chandurbazar road Crash
अहमद खान (Pudhari Photo)
Published on
Updated on

Pickup Van Head-on Collision Morshi Chandurbazar road Crash

अमरावती : मोर्शी-चांदूरबाजार मार्गावर शुक्रवारी (दि. २३) दोन बोलेरो पिकअप व्हॅनच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक युवक घटनास्थळी ठार झाला. तर अन्य जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोर्शीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मधापुरी शेत शिवारात लखन लालाणी यांच्या शेतासमोर मोर्शीतील चिकन सेंटर चालवणारे अहमद खान मोहम्मद खान (वय ४२, रा.फरीद कॉलनी, मोर्शी) आपली बोलेरो पिकअप गाडी (एम एच २७ एक्स ३०१२) या वाहनाने अंबाडा येथील पोल्ट्री फार्मवर कोंबड्या घेण्याकरिता निघाले होते.

दरम्यान, विरुद्ध दिशेने कोंबड्या घेऊन येणार्‍या बोलेरो पिकअप (एम एच ४८ ए जी ६७३६) या दोन्ही वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली. यात अहमद खान यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला समीर राजकुमार साठवणे (वय २२, रा. पेठपुरा, मोर्शी) याला गंभीर जखमी अवस्थेत अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. समोरून येणार्‍या बोलोरो पिकअपमधील मनोज विष्णू कुसराम (वय २२), राकेश फकीरचंद यादव (वय ३३) व मोनू भोजराज दुर्गे (वय३२) तिघेही रा.वरुड यांना जखमी अवस्थेत मोर्शीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Morshi Chandurbazar road Crash
अमरावती : कॉंग्रेस नेत्याचा मुलगा लग्नाच्या आदल्यादिवशीच बेपत्ता; शोधाशोध सुरू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news