

अमरावतीः माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. असून हैदराबाद येथून ही धमकी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबधित व्यक्तिने एक पत्र पाठवले असून यामध्ये अपशब्द वापरत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या अगोदर अनेकदा नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत.
आठवडाभरात धमकीचे दुसरे पत्र
याबाबत अधिक माहिती अशी की हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या एका व्यक्तीकडून घाणेरड्या शब्दात नवनीत राणांना पत्र स्वरुपात धमकी आली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात त्यांना धमकीचे पत्र आले होते तोवर लगेच आठवडाभरात नवनीत राणांना दुसऱ्यांदा धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात आलेल्या पत्राबद्दल राणा यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती. पण अद्याप याबाबत पोलिसांकडून कोणती ॲक्शन करण्यात आली आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी तपासात नेमकी काय चौकशी केली हे अद्याप अस्पष्ट आहे.
वारंवार नवनीत राणांना धमक्या येत असल्याने आता नेमका पोलीस कशा पद्धतीने तपास करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.आज आलेल्या पत्राबाबात नवनीत राणा यांचे खाजगी स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांच्याकडून राजापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.