Amravati Crime | आई नव्हे वैरीण : प्रेमसंबंधाच्या आड येणाऱ्या मुलाचा आईनेच काढला काटा: चौघांकडून स्प्रिंकलरच्या पाईपने बेदम मारहाण

Amravati Murder Case | धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापुरातील हृदयद्रावक घटना
Dattapur mother kills son
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केलीPudhari
Published on
Updated on

Dattapur mother kills son

अमरावती : मातृत्वाची माया जगातील सर्वात पवित्र भावना मानली जाते. मात्र अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात घडलेल्या एका घटनेने ही भावना तुडवली गेली आहे. प्रेमाच्या अंधत्वात एका आईनेच आपल्या मुलाच्या जीवावर उठण्याचा कट रचला आणि साथीदारांच्या मदतीने मुलाचे प्राणही घेतले. 7 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

मृत गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे (वय २६, रा. साईनगर, धामणगाव रेल्वे) हा आईच्या गैरकृत्यांना आडवा येत होता. त्याची आई दुर्गा (वय ४५) हिचे मनोज एकनाथराव किर्तन (वय ५७, रा. दत्तापुर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या नात्याला मुलाने विरोध केला. मात्र त्या विरोधाची किंमत त्याने स्वतःच्या जीवाने चुकवली. आरोपी मनोज किर्तन, दुर्गा वारंगणे, अमोल अर्जुन आणि अशोक चवरे या चौघांनी मिळून शुभमला आसेगाव शेतशिवारातील गृप्ता यांच्या शेतात नेले. तिथे त्याचे हातपाय दोरीने बांधले, स्प्रिंकलरच्या लोखंडी पाईपाने हातपायावर जबर मारहाण केली. वेदनेने तडफडणारा शुभम मदतीसाठी हाका मारत राहिला. पण त्याच्या हाकेला कुणीच उत्तर दिलं नाही. आईसमोरच मुलाचा श्वास थांबला.

Dattapur mother kills son
Amravati Police | हरविलेली चिमुकली तीन तासांत आई-वडिलांच्या स्वाधीन: अमरावती पोलिसांची तत्परता

याप्रकरणात दत्तापुर पोलिसांनी फिर्यादीनुसार बीएनएस कलम १०३(१), २३९, ३८५ नुसार गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड़ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे, पुंडलिक चव्हाण, पोहेका अतुल पाटील, हरिहर वैद्य, दीपक पंधरे, सागर कदम, नवनाथ खेडकर, पवन हजारे, किरण पवार, निलीमा खडसे, मयुर ढवक व पियूष चौबे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news