

Youth Dead body found in Amravati
अमरावती : स्थानिक छत्री तलाव परिसरात शुक्रवारी (दि.२३) पाण्यावर तरंगताना एका तरुणाचा मृतदेह आढळला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच राजापेठ पोलीस आणि अग्निशमन विभागचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून पंचनामा केला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. सुरज रमेश कुकडे (वय ३६, रा. राजापेठ इंदिरानगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज कुकडे गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होता. तो कम्प्युटर सर्विसेस चे काम करत होता. सुरज विवाहित होता. पत्नीसोबत त्याचा वाद सुरू होता. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी राहत होती. गुरुवारी सकाळी तो कामावर गेला. मात्र, रात्री घरी परत आला नाही. आणि शुक्रवारी नागरिकांना छत्री तलावात त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पुढील तपास सुरू आहे.