अमरावती : तरुणाचे अपहरण करून निर्घृण हत्या; चार संशयितांना अटक

मित्राच्या हत्येचा काढला वचपा अन् मृतदेह फेकला नालीत
Amravati Murder Case
मृत यश रोडगेPudhari Photo
Published on
Updated on

मित्राच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून शहरात सातूर्णा मार्गावर एका तरुणाची चाकु व तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. यश रोडगे (वय २१, रा. मराठा कॉलनी, गोपालनगर) असे मृतक युवकाचे नाव आहे. संशयित आरोपी तरुणांनी यश वर आधी चाकु व तलवारीने हल्ला केला, त्यानंतर त्याचे अपहरण केले. नंतर तो मृत झाल्याचे पाहून त्याचा मृतदेह भातकुली मागार्वरील कचरा डेपो परिसरात नेऊन फेकण्यात आला. ही घटना बुधवारी (दि.21) रात्री घडली असून पोलिस संपूर्ण रात्रभर मृतक व आरोपींचा शोध घेत होते.

या घटनेच्यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करत गुरुवारी (दि.22) राजापेठ पोलिस ठाण्यावर धडक दिली होती. दरम्यान या हत्येच्या गुन्हात पोलिसांनी आरोपी तक्षदीप इंगळे (वय २०), दीपक ठाकूर (वय २५), श्रेयस आवटे (वय १९) व अरबाज खान इरफान खान (वय १८, रा. म्हाडा कॉलनी) यांना अटक केली आहे. या प्रकरणी दोन विधी संघर्षीत बालकांनाही ताब्यात घण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दसरा मैदानामागील न्यु स्वस्तिकनगर चौकात एका नाश्ता सेंटरवर बुधवारी (दि.२१) रात्री यश व त्याचा मित्र आकाश रामटेकेसह दोन तरुणींसोबत उभा होता. त्याचवेळी तेथे आरोपी पोहोचले आणि त्यांनी आपल्या लावा नामक मित्राची हत्या केल्याच्या कारणावरून यश याच्यावर तलवार व चाकुने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात यश हा गंभीर जखमी झाला. त्यावेळी आरोपींनी त्याला दुचाकीवर बसून त्याचे अपहरण केले.

या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा शोध सुरु केला होता. दरम्यान गुरुवारी वेळेत यश रोडगेचा मृतदेह भातकुली मार्गावर एका नालीत दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी यशच्या मृतदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. यशच्या नातेवाईकांसह त्याच्या मित्रांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपला रोष व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. याप्रकरणी, मृताचा मित्र तथा घटनेत जखमी झालेल्या आकाश रामटेके (वय २१, रा. गोपालनगर) याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news