अमरावती | कन्टेनरमधून ३५ लाखांचा गुटखा जप्त

दिल्लीतून-अकोला जाणार होता गुटखा ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Amaravati News
कन्टेनरमधून ३५ लाखांचा गुटखा जप्तPudhari
Published on
Updated on

अमरावती : कन्टेरमधून गुटख्याची वाहतूक करणा-या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तळेगाव- तिवसा हायवेवरील वरखेड रस्त्यावरून ताब्यात घेतले. गुलाब सरमन अहेरवार (वय ४४, रा. गोना, तहसिल पाली, जिल्हा ललितपुर, राज्य उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ३५ लाख रुपये किमंतीचा प्रतिबंधीत गुटखा, कन्टेनर व मोबाईल असा एकुण ७१ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस चौकशीनंतर हा गुटखा माल दिल्लीतून अकोला येथे जात असल्याची माहिती पुढे आली आहे.        

अमरावती ग्रामिण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी प्रतिबंधीत केलेल्या सुंगधित तंबाखुसह गुटखा विक्रेता व वाहतूक करणा-यावर कारवाई करण्याचे सर्व पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना निर्देश दिले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस १५ एप्रिल रोजी तिवसा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना गोपनिय माहीती मिळाली की, नागपुरकडून अमरावती-अकोलाकडे एका कन्टेनरमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतुक होत आहे. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळेगाव ते तिवसा हायवेवरील वरखेड जवळ सापळा रचला. त्यावेळी तळेगावकडुन तिवसाकडे एक कंटेनर संशयितरित्या येताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी कंटेनरला थांबवून पाहणी केली असता कंटेनरमध्ये एक इसम बसुन होता. त्याने त्याचे नाव गुलाब सरमन अहेरवार, असे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी कंटेनरची पंचासमक्ष झडती घेऊन गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना कंटेनरमध्ये १०० पोते बहार सुगंधीत पान मसाला व बिएचआर सुगंधीत तंबाखु असा ३६ लाख ६० हजाराचा माल मिळून आला. चालकाची चौकशी केली असता, हा माल दिल्ली येथून आणुन अकोला येथे घेऊन जात असल्याचे गुलाब सरमन अहेरवार याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातील गुटखा तसेच वाहतुक करण्याकरीता वापरलेले कंटेनर क्रमांक आरआय ११ जीसी ०३५२, आणि १० हजाराचा स्मार्टफोन असा एकुण ७१ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणात आरोपीविरुध्द तिवसा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३७५ सहकलम ५९ अन्न सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, मुलचंद भांवुरकर, पोलिस अंमलदार बुद्धवंत दाभणे, रविन्द्र बावणे, भुषण पेठे, मंगेश लकडे, सचीन मसांगे, चालक संजय प्रधान यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news