एक दुजे के लिए : प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीनेही जीवन संपवले

चुनाभट्टी परिसरातील घटना; प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही
Amravati Crime News
प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रियसीनेही आपले जीवन संपविलेPudhari File Photo

अमरावती : आजारी असलेल्या प्रियकराचा अचानक मृत्यू झाल्याने हताश झालेल्या प्रेयसीने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या चुनाभट्टी परिसरामध्ये उघडकीस आली.

Amravati Crime News
वाढदिवसाला दारू दिली नाही; मित्राचा चौथ्या मजल्यावरून फेकून खून

याबाबत अधिक माहिती अशी, मृत तरूणी ही चुनाभट्टी परिसरात आपल्या मावशीकडे राहत होती. येथे शेजारी राहणार्‍या एका युवकासोबत तिचे प्रेमसुत जुळले होते. मात्र त्या युवकाचा दोन दिवसांपूर्वी २९ जून रोजी आजारी असल्यामुळे मृत्यू झाला. प्रियकराच्या मृत्यूमुळे ती तरुणी हताश झाली होती. काय करावे आणि काय नाही, हे तिला कळत नव्हते. अशातच तिने निराशेच्या भावनेतून मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला. मावशीच्या राहत्या घरात गळफास लावून तिने स्वत:चे जीवन संपविले.

Amravati Crime News
Kolhapur Crime News : राजारामपुरी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून

या घटनेच्या वेळी घरात कोणीच नव्हते. तिची मावशी आणि तिचा भाऊ बाहेर गेले होते. मावशी जेव्हा घरी आली तेव्हा तिने दार वाजवले. बराच वेळ झाल्यावरही दार न उघडल्याने मावशीने आरडाओरड केली. तेव्हा शेजारचे लोक गोळा झाले आणि त्यांनी अखेर घराचे दार तोडले. त्यांनतर घरात जाताच सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली. तरूणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती शेजार्‍यांनी राजापेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news