Amravati Accident : दर्यापूर-अमरावती मार्गावर एसटी बसच्या धडकेत एका मजुराचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

Amravati Accident : दर्यापूर-अमरावती मार्गावर एसटी बसच्या धडकेत एका मजुराचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी
Published on
Updated on

अमरावती : दर्यापूर-अमरावती मार्गावरील आराळा फाट्याजवळ नागपंचमीच्या दिवशी (दि. १७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका ३० वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील हे आदिवासी मजूर दर्यापूर येथे शेतीकामासाठी आले होते. आराळा-बोराळा रस्ता ओलांडताना अमरावतीहून दर्यापूरकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात छोटेलाल सुखलाल डिकारे (वय ३०, रा. जि. बैतुल, मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रेमदास बाजीलाल कासदेकर व हिरालाल बारसकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक विकी होले आणि सचिन शेलारे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती छोटेलाल डिकारे यांना मृत घोषित केले. रुग्णालयात अंकुश कावडकर, नितेश वानखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी मदत केली.

या अपघातामुळे अमरावती-दर्यापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खल्लार व दर्यापूर पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक पूर्ववत केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news