

अमरावती, पुढारी वृत्तसेवा:
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून चौफेर टीका होत आहे. राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्या दरम्यान आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी सोमवारी (दि.१६) तीव्र संताप व्यक्त करत गायकवाड यांचा निषेध केला आहे.
खासदार बळवंत वानखडे म्हणाले, संजय गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडाने वाया गेलेले अडाणी आहेत. राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्यांना बक्षीस देण्याचं जाहीर वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. या वक्तव्याचा मी निषेध करतो, शिंदेंनी दिलेल्या पैशामुळे गायकवाड यांना अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्याकडून सातत्याने केले जात आहे. काँग्रेस पक्ष त्यांना येत्या काळात नक्कीच धडा शिकवेल. असा इशारा खासदार बळवंत वानखडे यांनी दिला आहे.