Amravati Video Case : अमरावती लैंगिक शोषण प्रकरणात 8 आरोपींना बेड्या, ‘त्या’ सदनिकेचा मालकही चौकशीच्या फेर्‍यात

आरोपींकडून लॅपटॉप, टॅब आणि हार्डडिस्क जप्त
Amravati Video Case : अमरावती लैंगिक शोषण प्रकरणात 8 आरोपींना बेड्या, ‘त्या’ सदनिकेचा मालकही चौकशीच्या फेर्‍यात
Published on
Updated on

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणात पोलिसांनी कारवाईची व्याप्ती वाढविली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी चार आरोपींना अटक केल्यामुळे आता एकूण अटकेत असलेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अयान अहमद (वय १९) याने पीडित मुलींचे लैंगिक शोषण करण्यासाठी अमरावती येथील एका मित्राची सदनिका वापरल्याची कबुली दिली आहे.

अमरावती शहरातील कठोरा मार्गावरील एका सदनिकेत हे कृत्य घडल्याचे समोर आले आहे. ही सदनिका उपलब्ध करून देणारा मुख्य आरोपीचा मित्र मानव दीपक सुगंधे (२०, रा. आर्वी,जि.वर्धा ह.मु. अमरावती) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, पीडित मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी आरोपी एैफाज खान मंजूर खान (वय २६), मोहम्मद इम्रान मोहम्मद साजिद (वय २१) आणि शेख नावेद शेख हसन (वय २१, तिघेही रा. अचलपूर) या तिघांना अचलपूर येथून अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, टॅब आणि हार्डडिस्क जप्त केली असून, ती फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस अधीक्षक शुभमकुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तांत्रिक तपासाद्वारे अश्लील साहित्य एकमेकांना पाठवणार्‍या आणखी काही व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आहेत. परिसरातील नागरिकांच्या मते, संबंधित सदनिकेत अनेक तरुण-तरुणींची वर्दळ असायची, ज्याकडे सदनिका मालकाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आता हा सदनिका मालकही पोलिसांच्या चौकशीच्या फेर्‍यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news