Amravati Teachers Constituency Election | अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ८१ मतदान केंद्रे; २४३ अधिकारी-कर्मचारी नियुक्त

पाच जिल्ह्यांत ३५,८१० मतदार; २६ उमेदवार रिंगणात
Amravati  Constituency Election
Amravati Constituency Election Pudhari
Published on: 
Updated on: 

Maharashtra MLC Election

बुलढाणा : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात २६ उमेदवार असून, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ८१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांवर ३५ हजार ८१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. याशिवाय, ८१ मतदान केंद्रांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी २८ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण २४३ अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Amravati  Constituency Election
Amravati News : यशोमती ठाकूर यांच्या घरावर ड्रोनद्वारे नजर? परिसरात खळबळ; तक्रार दाखल

पाच जिल्ह्यांत मतदारांचे चित्र

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. अमरावती जिल्ह्यात १० हजार ९७, अकोला जिल्ह्यात ५ हजार ९४२, बुलढाणा जिल्ह्यात ९ हजार १२४, वाशिम जिल्ह्यात ३ हजार ७१५, तर यवतमाळ जिल्ह्यात ६ हजार ९३२ मतदार आहेत. अशा प्रकारे पाचही जिल्ह्यांतील एकूण मतदारसंख्या ३५ हजार ८१० आहे.

बुलढाण्यात १८ मतदान केंद्रे

जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या पाहता, अमरावती जिल्ह्यात २५, अकोला जिल्ह्यात १३, बुलढाणा जिल्ह्यात १८, वाशिम जिल्ह्यात ७ आणि यवतमाळ जिल्ह्यात १८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवरील प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून, त्याद्वारे निवडणूक कामकाजावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

Amravati  Constituency Election
Amravati News : मृत्यूच्या दारातही उजळला मानवतेचा दीप; 'ब्रेन डेड' धीरजच्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान

२७ ऑक्टोबरला मतमोजणी

मतदानानंतर सर्व मतपेट्या अमरावती येथील लोकशाही भवनात उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी लोकशाही भवन येथे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण अमरावती विभागाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news