Amravati Tahsildar Suspended | अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे निलंबित

गंभीर प्रशासकीय अनियमिततेचा ठपका-विभागीय चौकशी प्रस्तावित
Tahsildar Vijay Lokhande Suspended
Tahsildar Vijay Lokhande SuspendedPudhari
Published on: 
Updated on: 

Tahsildar Vijay Lokhande Suspended

अमरावती : आपल्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करून भूखंड विभाजन, एकत्रिकरण व अकृषक परवानग्यांबाबत गंभीर प्रशासकीय अनियमितता केल्याप्रकरणी अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना राज्य शासनाने तत्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाद्वारे ६ नोव्हेंबर २०२६ रोजी या कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत.नकाशा, अकृषक परवानगी व संबंधित नियोजन प्राधिकरणाच्या मान्यतेची शिफारस न तपासता बेकायदेशीर आदेश पारित करणे, तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५५ चा गैरवापर करून अधिकार अभिलेखात नवीन ७/१२ उतारे तयार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Tahsildar Vijay Lokhande Suspended
Amravati News : अमरावतीत खळबळ! जिल्हा सत्र न्यायालयाला उडवून देण्याची धमकी; परिसर तातडीने रिकामा

याशिवाय, जमाबंदी आयुक्तांच्या निर्देशानुसार 'ई-हक्क' प्रणाली अनिवार्य असताना ऑफलाइन अर्ज स्वीकारणे, मूळ खातेदारांना वैधानिक नोटीस न बजावणे आणि नैसर्गिक न्यायतत्त्वाचा भंग करत एकतर्फी निर्णय देणे अशा अनेक गंभीर त्रुटी त्यांच्या कामकाज पद्धतीत आढळून आल्या आहेत. या कृतीमुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे उल्लंघन झाले असून, लोखंडे यांच्याविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम-८ नुसार विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

निलंबन कालावधीत विजय लोखंडे यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे निश्चित करण्यात आले असून जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच नियमानुसार त्यांना निलंबन निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील, मात्र या काळात त्यांना कोणताही खासगी व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नाही. संतोष आठरे नवे तहसीलदार-विजय लोखंडे यांच्या निलंबनामुळे रिक्त झालेल्या अमरावती तहसीलदार पदावर महसूल विभागाकडून तात्काळ प्रशासकीय व्यवस्था करण्यात आली आहे.

Tahsildar Vijay Lokhande Suspended
Amravati News : यशोमती ठाकूर यांच्या घरावर ड्रोनद्वारे नजर? परिसरात खळबळ; तक्रार दाखल

विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासनाचे तहसीलदार असलेले संतोष राधाकिसन आठरे यांची सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने अमरावती येथील रिक्त पदावर बदली करण्यात आली असून, त्यांना तात्काळ ९ नोव्हेंबर २०२६ रोजी नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.