Amravati Crime | मंगलधाम रोडवर देहविक्रीचा भंडाफोड : तीन महिलांसह एक जण ताब्यात

दस्तुरनगर परिसरातील चित्रा कॉलनी येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिस पथकाची धाड
Flesh trade busted Amravati
Flesh trade busted AmravatiPudhari
Published on
Updated on

Flesh trade busted Amravati

अमरावती : शहरातील दस्तुरनगर परिसरातील चित्रा कॉलनी येथे सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, महिला सेल व दामिनी पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. एका पुरुषासह महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी ही कारवाई पार पडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगलधाम रोडवरील चित्रा कॉलनी, दस्तुरनगर येथे एका घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिप्ती ब्राम्हणे यांच्या नेतृत्वाखाली महिला सेलच्या पथकाने सापळा रचला. संशयाची खात्री करण्यासाठी दोन बनावट ग्राहक (पंटर) पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकत घटनास्थळावरून संबंधितांना ताब्यात घेतले.

Flesh trade busted Amravati
Child marriage Amravati | अत्याचारातून गर्भवती: अल्पवयीन मुलीचे लावून दिले लग्न; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

या कारवाईत सुदेश (वय २२, रा. राहुलनगर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह एका महिला आरोपीविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याशिवाय घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य दोन महिलांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news