

अमरावती : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अमरावतीहून नागपूरकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकने बुधवारी (दि.२९) भिष्णूर फाटा येथे अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या बंबांना तत्काळ घटनास्थळी पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेचा पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे.