Amravati Accident | अमरावती-नागपूर महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, दोघे ठार 

वरखेड फाट्याजवळ ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक
Amravati Nagpur Highway Two-Wheeler Collision
Amravati Nagpur Highway Two-Wheeler CollisionPudhari
Published on: 
Updated on: 

Amravati Nagpur Highway Two-Wheeler Collision

अमरावती: नागपूरवरून अमरावतीकडे जाणार्‍या भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली.या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री ७ वाजता अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसा वरखेड फाट्यानजीक घडली.

निखिल राजेंद्र बोके (वय ३५),कैलास मनोहर कळंबे (वय ३३ ) दोघेही रा. उंबरखेड असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

मृतक निखिल बोके व कैलास कळंबे हे दोघेही तिवसा येथून आपल्या गावी एकाच दुचाकीने जात होते. यावेळी एमएच १४ एलक्स १३२० क्रमांकाची पर्पल कंपनीची ट्रॅव्हल्स ही नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जात होती. याच दरम्यान महामार्ग ओलाडून वरखेड फाट्याकडे आपल्या दुचाकीने जात असताना ट्रॅव्हल्सची जबरदस्त धडक दुचाकीला बसली.

Amravati Nagpur Highway Two-Wheeler Collision
Amravati News : यशोमती ठाकूर यांच्या घरावर ड्रोनद्वारे नजर? परिसरात खळबळ; तक्रार दाखल

यात घटनास्थळीच निखिल बोके व कैलास कळंबे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.ट्रॅव्हल्ससह चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

मृत कैलास कळंबे यांची पत्नी ही आठ महिण्याची गर्भवती असून पुढील महिण्यातच पत्नीच्या प्रसुतीची तारीख होती. कुटुंबात लवकरच आंनदाचे वातावरण येणार होते, अशातच पतीच्या निधनाची माहिती कुटुंबाला मिळाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक कळंबे यांच्या पच्छात आई, वडिल, एक मुलगी तर निखिल बोके यांच्या पश्श्चात आई, वडिल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news