Amravati Municipal Corporation | स्वच्छता विभागातील ४ कर्मचारी निलंबित; ७० जणांना कारणे दाखवा नोटीस

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महापालिका आयुक्तांना आस्थापनेवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना
Amravati Municipal Corporation
Amravati Municipal Corporation Pudhari
Published on
Updated on

Amravati Sanitation Department Employee Suspension

अमरावती : शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर अखेर अमरावती महापालिकेने कडक पाऊल उचलले असून ४ सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच ७० सफाई कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर (दि.२५)  ही कारवाई करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांसह प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

महिला दिनानिमित्त सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमात शहरातील वाढत्या घाणीच्या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका आयुक्तांना स्पष्ट शब्दांत आस्थापनेवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. महापालिकेत तीनशे आस्थापनेवरील स्वच्छता कर्मचारी आहेत. सर्व सुविधा व भक्कम वेतन

Amravati Municipal Corporation
Amravati Police Death | धक्कादायक: अमरावती पोलीस आयुक्तालयात पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून जीवन संपविले

घेऊनही हे कर्मचारी काम करत नाही, असा आरोप करण्यात येत होता. त्यानुषंगाने प्रशासनाने चौकशी सुरू केली. त्यामध्ये अनेक महिन्यांपासून काही कर्मचारी उपस्थित नसल्याचेच दिसून आले. कर्मचारी हजर नसतानाही त्यांचे वेतन व बाकी सुविधा याबाबत शंका उपस्थित झाल्यात. संपूर्ण चौकशी केल्यावर ही कारवाई अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या वतीने करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news