Amravati Gutkha Seized | मोर्शीत ३५ लाखांचा गुटखा जप्त, मध्यप्रदेशातून तस्करी; चालकाला अटक, तिघांविरुद्ध गुन्हा

ट्रकसह ५५.०९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
Morshi Banned Gutkha Smuggling
Morshi Banned Gutkha SmugglingPudhari
Published on: 
Updated on: 

Morshi Banned Gutkha Smuggling

अमरावती : ट्रकमधून तब्बल ३५ लाख ९ हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह ट्रक असा एकूण ५५ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ट्रकचालकाला अटक केली आहे. या प्रकरणात गुटख्याचा पुरवठा आणि वितरण साखळीतील अन्य तिघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा ट्रकमधून जिल्ह्यात आणला जात असून, त्याची विविध ठिकाणी विक्री केली जाणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र येथे कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती तातडीने मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयित ट्रकचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी सुरू केली.

Morshi Banned Gutkha Smuggling
Amravati News : अमरावतीत खळबळ! जिल्हा सत्र न्यायालयाला उडवून देण्याची धमकी; परिसर तातडीने रिकामा

दरम्यान, एमएच १९ सी ०९८२ क्रमांकाचा ट्रक येताना दिसताच पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली. ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आढळल्याने पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. शाहरुख खान सर्फराज खान (वय ३२, रा. आवेजनगर, अमरावती) असे त्याचे नाव आहे. चौकशीदरम्यान शाहरुख खान याने हा गुटखा जावेद सेठ ऊर्फ जावेद हारून सुपारीवाला (रा. बडनेरा) याच्या पांढुर्णा येथील गोदामातून घेतल्याचे सांगितले. हा साठा चांद खान ऊर्फ चांदभाई याच्या गोदामात उतरविण्यात येणार असल्याची माहितीही त्याने दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईतून केवळ वाहतूक करणारा चालकच नव्हे, तर गुटख्याच्या साठवणुकीशी आणि वितरणाशी संबंधित व्यक्तींचे धागेदोरेही समोर आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घनश्याम दंदे यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी ट्रकचालक शाहरुख खान, जावेद सेठ ऊर्फ जावेद हारून सुपारीवाला, चांद खान ऊर्फ चांदभाई (रा. अमरावती) आणि ट्रकमालक रेहान खान ऊर्फ रेहानभाई (रा. डी. एड. कॉलेजजवळ, धरमकाटा परिसर, अमरावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Morshi Banned Gutkha Smuggling
Amravati News : दुःखाच्या महापुरातही माणुसकीचा दीप! ब्रेन डेड अ‍ॅड. मनीषा बडगे यांच्या अवयवदानाने ५ जणांना नवजीवन

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश देशमुख, श्रीकांत पाटील, मोहम्मद अमीर, धनसिंग ठाकूर, मनोज गावंडे, राजकुमार थोटे, छत्रपती करपते आणि अथर्व कोहळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.