Ravi Rana | “पुढच्या वर्षी मंत्री म्हणूनच येणार”; रवी राणा यांच्या विधानामुळे अमरावतीत राजकीय चर्चांना उधाण

मंत्रीपदाचा शब्द नेमका महायुतीत कोणी दिला?
Amravati Political News
MLA Ravi RanaPudhari
Published on: 
Updated on: 

Amravati Political News
अमरावती:
बडनेरा येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला नरकासुर दहन कार्यक्रम यंदाही अत्यंत उत्साहात पार पडला. मात्र, या कार्यक्रमादरम्यान आमदार रवी राणा यांनी मंत्रिपदाबाबत केलेल्या एका सूचक विधानामुळे अमरावतीसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुढच्या वर्षी नरकासुर दहनाला मी मंत्री म्हणूनच येणार. मला माझ्या नेत्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यांनी मला तसा शब्द दिला आहे, असा ठाम विश्वास आमदार रवी राणा यांनी या वेळी व्यक्त केला. मंत्री झाल्यानंतर बडनेरा आणि अमरावतीच्या विकासाला न्याय देण्याची जिद्दही त्यांनी बोलून दाखवली. 

Amravati Political News
Amravati News : अमरावतीत खळबळ! जिल्हा सत्र न्यायालयाला उडवून देण्याची धमकी; परिसर तातडीने रिकामा

मंत्रिपदाचा शब्द देणारा तो 'नेता' कोण?रवी राणा यांनी "माझ्या नेत्यावर विश्वास आहे" असा उल्लेख केल्याने, त्यांना मंत्रिपदाचा शब्द नक्की कोणी दिला यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार रवी राणा यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध आहेत. राणा यांच्या 'युवा स्वाभिमान पक्षा'ने आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना फडणवीस यांनी यापूर्वी अमरावतीत विशेष हजेरी लावली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही रवी राणा यांचे जवळचे संबंध आहेत. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. महायुतीतील या दोन्ही प्रमुख नेत्यांशी रवी राणा यांचे निकटचे संबंध असल्याने, त्यांना मंत्रिपदाबाबत नक्की कोणाकडून आश्वासन मिळाले आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.