

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सुप्रसिद्ध महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शुक्रवारी (दि.२१) हॉस्टेलच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित विद्यार्थ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सद्या उपचार सुरू आहेत. (Amravati News)
या घटनेपूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहिली आहे. पोलिसांनी ती जप्त केली आहे. माहितीनुसार वैद्यकीय अभ्यासक्राच्या तृतीय वर्षात शिकणार्या या भावी महिला डॉक्टरने शुक्रवारी होस्टेलच्या तिसर्या माळ्यावरून उडी मारली. हे लक्षात येताच तिथे उपस्थित विद्यार्थ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. उडी मारण्यापूर्वी तिने आपल्या हाताची नस सुद्धा कापली होती. एका विषयामध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येपूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहिलेली आहे. त्यामध्ये तिने या गोष्टीचा उल्लेख केला आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तिचा जबाब घेतला. या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.