

Amravati Accident
अमरावती : नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत लालखडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मजुराचा सोमवारी (दि.२८) मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान मृत मजुराची ओळख अद्याप पटलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, लालखडी परिसरात सोमवारी भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने परिसरातील एका मजुराला चिरडले. या अपघातात तो मजूर जागीच ठार झाला. घटनेनंतर वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात असून वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.