Amravati Burglary | अमरावतीत ५ न्यायाधीशांच्या घरांवर चोरट्यांचा डल्ला: १.२७ लाखांचा मुद्देमाल लंपास

शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे घरांना कुलूप असल्याची खात्री करून चोरट्यांची घरफोडी
Theft in VIP area Amravati
Theft in VIP area Amravati Pudhari
Published on
Updated on

Theft in VIP area Amravati

अमरावती : न्यायाधीशांच्या घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला असून १.२७ लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. येथील अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील न्यायाधीश कॉलनी आणि न्यायालयीन कर्मचार्‍यांच्या वसाहतीत झालेल्या घरफोड्यांमध्ये सुमारे १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस पंचनाम्यातून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे पाच न्यायाधीश व दोन न्यायालयीन कर्मचारी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरांना कुलूप असल्याची खात्री करून चोरट्यांनी डाव साधला. ‘नल-दमयंती’ इमारतीतील तीन घरांचे कुलूप तोडण्यात आले, तर ‘पैनगंगा’ इमारतीतील दोन न्यायाधीशांच्या घरांत चोरी झाली. तसेच जज कॉलनीमागील न्यायालयीन कर्मचार्‍यांच्या दोन इमारतींतील चार घरांतही घरफोडी करण्यात आली.

Theft in VIP area Amravati
Amravati Crime | अमरावतीत मनोरुग्ण युवतीवर अत्याचार : संशयितास पोलिसांनी केले तात्काळ जेरबंद

१.२७ लाखांचा प्राथमिक अंदाज

या प्रकरणी पोलिस हवालदार अथर अली एजाज अली बेग यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पंचनाम्यानुसार सुमारे १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा अंदाज आहे. संबंधित न्यायाधीश व कर्मचारी सध्या बाहेरगावी असल्याने ते परत आल्यानंतर नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला, याची स्पष्ट माहिती पुढील तपासात समोर येणार आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांची पाहणी

चोरीची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला व पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या झुडपांजवळून भिंत ओलांडून पळताना दिसत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत. कॉलनी परिसरात पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेच्या अधिकार्‍यांच्या निवासस्थानीच घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांकडून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news