Amravati Child Trafficking : अकोल्यातून चौथे बालक ताब्यात; बाळांच्या कथित खरेदी-विक्री प्रकरणाचे धागेदोरे तीन जिल्ह्यांत

आणखी दोन बालकांचा शोध सुरू, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बहुचर्चित बालविक्री प्रकरणाचा तपास आता वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोहोचला
Amravati Wardha  Child Selling Racket
Amravati Wardha Child Selling Racket Pudhari
Published on: 
Updated on: 

Amravati Wardha Child Selling Racket

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या बहुचर्चित बालविक्री प्रकरणाचा तपास आता वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोहोचला आहे. या प्रकरणात शुक्रवारी (दि. २०) पोलिसांनी अकोला जिल्ह्यातून चौथ्या बालकाला सुरक्षित ताब्यात घेतले. यासोबतच बालकाच्या पालक दाम्पत्यालाही अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार बालकांची सुटका करण्यात आली असून, एकूण १३ जणांना अटक झाली आहे. आणखी काही जणांचा सहभाग उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. वैशाली प्रफुल्ल भोजने (वय ४९) आणि तिचा पती प्रफुल्ल वसंतराव भोजने (वय ५६, रा. बूटी प्लॉट, राजापेठ,अमरावती) यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलीस कोठडीदरम्यान डॉ. वैशाली भोजने हिने दिलेल्या जबाबात, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता पालकांच्या परस्पर संमतीने सहा बालकांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Amravati Wardha  Child Selling Racket
Amravati News : अमरावतीच्या संशोधकाची जागतिक भरारी! हुआवेईच्या पेटंटमध्ये डॉ. विजय इंगोलेंच्या संशोधनाची दखल

यापैकी आतापर्यंत चार बालकांना सुरक्षित ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, उर्वरित दोन बालकांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात पहिले बालक गुन्हा दाखल झाला. त्याचवेळी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांच्या ताब्यात आले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबरला वर्धा जिल्ह्यातून दुसरे, तर १९ नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यातून तिसरे बालक सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी २० नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यातून चौथे बालक शोधून काढण्यात आले.

भोजने दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत वाढ

भोजने दाम्पत्याच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत २१ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या दाम्पत्यासह राजुरा (अमरावती) येथील एक महिला (वय ४५) आणि डफरीन रुग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचारी (वय ४६, रा.) यांना न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या अकोल्यातील पालक दाम्पत्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Amravati Wardha  Child Selling Racket
Amravati Wardha child trafficking racket | अमरावतीतील बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे वर्ध्यापर्यंत, सहा बालकांची देवाणघेवाण झाल्याचा खुलासा

तीन जिल्ह्यांतील पालकांचाही सहभाग

या प्रकरणात आतापर्यंत डॉ. वैशाली भोजने, प्रफुल्ल भोजने, मयूर थांडगे, एक विधिसंघर्षग्रस्त बालक, निर्मल सरदार, दोन महिला यांच्यासह वर्धा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन महिला-पुरुष पालकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या कथित बालविक्री प्रकरणाचे जाळे तीन जिल्ह्यांपर्यंत विस्तारल्याचे स्पष्ट होत आहे.

पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त शाम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. उर्वरित दोन बालकांचा शोध आणि या प्रकरणातील अन्य सहभागींची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.