Amravati News | अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मानवी अवयव आढळल्याने खळबळ

वॉर्ड क्रमांक ९ समोर श्वान मानवी पायाचे लचके तोडत असल्याचे कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रकार उघडकीस
Amravati District General Hospital
वॉर्ड क्रमांक ९ समोर श्वान मानवी पायाचे लचके तोडत असल्याचे कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. Pudhari
Published on: 
Updated on: 

Amravati District General Hospital Human Body Parts Found

अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) परिसरात गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी मानवी शरीराचे वेगवेगळे अवयव आढळून आल्याने अमरावतीत मोठी खळबळ उडाली. वॉर्ड क्रमांक ९ समोर श्वान मानवी पायाचे लचके तोडत असल्याचे कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

परिसरात शोधमोहीम राबविल्यानंतर दोन हात, एक पाय आणि डोके असे अवयव आढळून आले. हे अवशेष एका भिकार्‍याचे असून चार दिवसांपूर्वी नाल्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोतवाली पोलिसांनी पंचनामा करत अवशेष उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) पाठविले आहेत.

Amravati District General Hospital
Amravati News : अमरावतीच्या संशोधकाची जागतिक भरारी! हुआवेईच्या पेटंटमध्ये डॉ. विजय इंगोलेंच्या संशोधनाची दखल

दरम्यान अशा प्रकारे एकाच परिसरात दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे आढळलेले अवयव नेमके कोणाचे आहेत. ते स्त्रीचे आहेत की पुरुषाचे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

तसेच हे अवयव रुग्णालय परिसरात कसे आले, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी मानवी अवयव आढळून आल्याने या प्रकाराचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.