Lightning Strike | वीज कोसळून शेतात काम करणार्‍या ४ महिला जखमी; दोघींची प्रकृती गंभीर

Amravati News | धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिरपूर येथील घटना
 lightning strike women injured in field
जखमी महिलांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत Pudhari
Published on
Updated on

lightning strike women injured in field

अमरावती: जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२६) दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिरपूर मध्ये चवरे यांच्या शेतात विज कोसळल्याने शेतात काम करणार्‍या चार महिला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

पिंकी प्रमोद बनसोड (वय ४०) व मीना नामदेव आत्राम (वय ३५) गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. धामणगाव रेल्वे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. तर शारदा प्रवीण कुडमते (वय ३०) व नंदा दिलीप ठाकरे (वय ३० ) या दोघी देखील जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 lightning strike women injured in field
Amravati Police | हरविलेली चिमुकली तीन तासांत आई-वडिलांच्या स्वाधीन: अमरावती पोलिसांची तत्परता

पावसाळ्यात वीज कडकडाटाच्या वेळी सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घटनेत जखमी चारही महिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना शासनाकडुन त्वरित मदत मिळावी, अशी मागणी हिरपुर ग्रामवासियांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news