Amravati Congress | दर्यापुरात काँग्रेसला धक्का: नगराध्यक्षांसह १७ नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश 

उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला
काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह तब्बल १७ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला
काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह तब्बल १७ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाPudhari
Published on
Updated on

Daryapur Congress Leader join Shiv Sena Shinde Faction

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात काँग्रेसला मोठा राजकीय हादरा बसला आहे. दर्यापूर नगरपरिषदेवर काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असतानाही काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह तब्बल १७ नगरसेवकांनी (दि.१४) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने दर्यापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या राजकीय भूकंपामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून, शिवसेना शिंदे गटाची ताकद दर्यापूरमध्ये वाढली आहे.

उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या संपूर्ण राजकीय घडामोडीत आमदार बच्चू कडू यांची भूमिका चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेतील एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवकांनी एकाचवेळी पक्षांतर केल्याने आगामी स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह तब्बल १७ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला
Amravati Accident | स्कूल बसच्या धडकेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू : आजोबांच्या डोळ्यांसमोर घडला अपघात

शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार्‍यांमध्ये नगराध्यक्षा मंदाकिनी सुधाकर भारसाकळे , अहमद खा हबीब खान, असुद्दुल्ला खान, वर्षा विनोद बोरकर, रामेश्वर शंकरराव चव्हाण, जुलैरखाबाई घाणीवाले, वंदना सोळंकी, मुनिफा आयुष्य, कविता दिलीप गवई, रेखाताई दिलीप चव्हाण, समिना परविन सय्यद, नदिन शेख, नशीब शेख, वसिम उद्धव नळकांडे, स्नेहा शिवाजी देशमुख आणि सुनिता संजय चव्हाण यांचा समावेश आहे.

याशिवाय स्वीकृत सदस्य रामेश्वर जगन्नाथ मालपाणी आणि ईश्वर बुंदिले यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दर्यापूर नगरपरिषदेतील काँग्रेसची मजबूत पकड मानली जात असताना नगराध्यक्षांसह मोठ्या संख्येने नगरसेवकांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेससाठी आत्मपरीक्षणाचा विषय ठरणार आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटासाठी ही मोठी राजकीय ताकद मानली जात असून, या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news