‘घरी चल’ म्हणताच पत्नीचा संताप; पतीवर दगडाने हल्ला 

Amaravati crime | प्रवीण प्रेमदास मनोहरेआणि त्यांच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून मतभेद सुरू होते
 Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

अमरावती : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना चौसाळा येथे घडली. या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी (दि.२५) संबंधित पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण प्रेमदास मनोहरे (वय ३४, रा. खरपी) आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून मतभेद सुरू होते. त्यामुळे पत्नी माहेरी राहत होती. दरम्यान, अंजनगाव परिसरातील एका लग्नसमारंभासाठी चौसाळा येथे पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पत्नी आपल्या भावासोबत उपस्थित होती. जेवणानंतर प्रवीण यांनी पत्नीला “आता आपल्या घरी चल” असे म्हणत सोबत येण्याची विनंती केली. मात्र, या गोष्टीचा राग आल्याने पत्नीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद काही वेळातच तीव्र झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात पत्नीने जवळच पडलेला दगड उचलून प्रवीण यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात प्रवीण मनोहरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर जखमी प्रवीण यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित महिलेविरुद्ध मारहाण व शिवीगाळीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news