Amravati crime | अकोली मार्गावर एसटी वाहकाची निर्घृण हत्या

खोलापुरी गेट परिसरातील घटना; पोलिस तपास सुरू
Amravati crime | अकोली मार्गावर एसटी वाहकाची निर्घृण हत्या
Published on
Updated on

अमरावती : शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत म्हाडा कॉलनीजवळील क्रिकेट मैदान परिसरात एसटी महामंडळातील एका वाहकाची हत्या झाल्याची धक्कादायक गुरुवारी (दि.९) घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

किरण पुणतांबेकर (वय ४५, रा. साईनगर, अकोली रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. सायंकाळी त्यांचा मृतदेह क्रिकेट मैदान परिसरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, अकोली रोड परिसरातील काही तरुणांनी किरण पुणतांबेकर यांना आधी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना जवळच्या निर्जन ठिकाणी नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

घटनेनंतर खोलापुरी गेट पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती संकलन सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. या हत्येमागील नेमके कारण काय आहे याचा शोध पोलिस घेत असून, विविध अँगलने तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news