

अमरावती : वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शिराळा परिसरात एका शेतात शुक्रवारी (दि.७) एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. खून करून पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असावा असा संशय पोलिसांना आहे.
माहितीनुसार शिराळा गावातील कापसाच्या शेतात काम करणार्या शेतमजुरांना हा मृतदेह शुक्रवारी सकाळी दिसला. मजुरांनी याची माहिती तात्काळ गावातील पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटलाने वलगाव पोलिसांना माहिती दिली.सूचना मिळताच वलगांव पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतकाचे वय २० ते २५ वर्ष आहे. त्याच्या शरीरावर चाकूने केलेले १५ ते २० घाव मिळून आले आहे. पुरावे मिटवण्याचे दृष्टीने हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस खूनाच्या दिशेने तपास करीत आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
प्रकरणाचे गांभीर्य पाहता अमरावती डीसीपी गणेश शिंदे, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्कॉड घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर अधिकृत गुन्हा दाखल करण्यात येईल. मृतकाची ओळख पटवण्यासाठी पोलीस युद्ध स्तरावर प्रयत्न करत आहे. वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक मिसिंग प्रकरणाचा शोध घेण्यात येत आहे. मृतदेह पूर्ण जळाला असल्याने त्याची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.