Amravati Crime | चांदूर रेल्वे तालुक्यातील २ तरुण पुण्यात २५० किलो गांजासह ताब्यात

शिरूर परिसरात पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; १.५१ कोटींचा मुद्देमाल जप्त
Ganja Seized In Pune
Ganja Seized In PunePudhari
Published on: 
Updated on: 

Ganja Seized In Pune

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दोन तरुणांना पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड-२ ने शिरूर परिसरात फिल्मी स्टाईलने पाठलाग करून २५० किलो गांजाची मोठी खेप पकडली. या कारवाईत महिंद्रा ७०० (XUV700) कारसह एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, रा. सांगोल वाडा) आणि अजय जगदीश मोहिते (वय ३०, रा. बागापुर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दोघेही चांदुर रेल्वे तालुक्यातील रहिवासी आहेत.

Ganja Seized In Pune
Amravati News : अमरावतीच्या संशोधकाची जागतिक भरारी! हुआवेईच्या पेटंटमध्ये डॉ. विजय इंगोलेंच्या संशोधनाची दखल

पुणे गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड-२ ला गांजाची मोठी खेप वाहून नेली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिरूर परिसरात सापळा रचून संशयित वाहनाचा पाठलाग केला. पोलिसांनी शिताफीने घेराव घालून कार थांबवली आणि झडती घेतली. या झडतीमध्ये वाहनातून २५० किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि कार असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

गांजा तस्करीच्या या मोठ्या कारवाईत अमरावतीसह चांदूर रेल्वे तालुक्यातील दोन तरुणांची नावे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन पुण्यात कोणाकडे जात होते आणि या तस्करीमागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पुणे गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स स्क्वॉडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.