Amaravati News : अमरावती शिक्षक मतदारसंघ शेवटच्या दिवशी २० उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

Maharashtra Legislative Council Election
Maharashtra Legislative Council ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

बुलढाणा: विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी, आज मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी २० उमेदवारांनी २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकुण संख्या ३१ झाली आहे.

आज नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सुमित सुरेशराव पवार (अपक्ष),उपेंद्र बाबाराव पाटील (शिवसेना+अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे- बोंडे ( भाजपा+२अपक्ष ), विनोद प्रल्हाद कडू (अपक्ष), दिलीप भिमराव कडू (अपक्ष),सजील खान खलील खान (अपक्ष), श्रीकृष्ण सुर्यभान पहुरकर (अपक्ष), अदिती ऋषिकेश पोहरे ( भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस- ३), भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव (भाजपा+अपक्ष), प्रा.डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष -३),प्रिती हर्षल रेवणे ( राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी+अपक्ष), गजानन रामचंद्र उल्हे (अपक्ष), मिलिंद तुकाराम ब्राह्मणे (अपक्ष),

किरण अर्जून चौधरी (अपक्ष), हेमलता दिलीपसिंग मुनोत (अपक्ष),किरण अर्जून पवार (अपक्ष), राजेशकुमार शालिग्राम कड (अपक्ष), प्रा.अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), रामदास संपतराव कटक (अपक्ष) यांचा समावेश आहे.

दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती येथे करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news