अमरावती जिल्ह्यात १५ कौशल्य केंद्रांची ग्रामीण भागात सुरुवात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

अमरावती जिल्ह्यात १५ कौशल्य केंद्रांची ग्रामीण भागात सुरुवात; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील ३५० तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव येथून जिल्हाधिकारी सौरभ कटियार दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रा'साठी अमरावती जिल्ह्यातील १५ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या केंद्रामधील अचलपूर तालुक्यातील कांडली येथून खासदार डॉ. अनिल बोंडे, चांदूर रेल्वे येथील आमला विश्वेश्वर येथून आमदार प्रताप अडसड, धारणी तालुक्यातील दिया येथून आमदार राजकुमार पटेल, नांदगाव पेठ येथून प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार, भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर येथून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा तसेच विविध केंद्रावरुन पदाधिकारी उपस्थित होते.

दूरदृष्य प्रणालीव्दारे प्रधानमंत्री मोदी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. शासनामार्फत युवकांसाठी प्रशिक्षण आणि संधीच्या दृष्टीने आगळी संकल्पना सुरु करीत आहोत. जगभरात भारतातील प्रशिक्षित तरुणांना मागणी आहे. अन्य देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढते आहे. एका सर्व्हेक्षणानुसार जगभरातील १६ देशांमध्ये ४० लाख प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा युवकांना या देशांमध्ये बांधकाम, आरोग्य, पर्यटन, आदरातिथ्य, शिक्षण आणि परिवहन अशा क्षेत्रात मोठी मागणी आहे. अशा कौशल्य विकास प्रशिक्षणातून आपण केवळ भारतासाठी नाहीतर, अशा देशांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडली, अमरावती येथील नांदगाव पेठ, अंजणगाव सूर्जी येथील कापूसतळणी, भातकूली येथील पूर्णा नगर, चांदूर रेल्वे येथील आमला विश्वेश्वर, चांदुरबाजार येथील करजगाव, दर्यापूर येथील येवदा, धामणगाव रेल्वे येथील जुना धामनगाव, धारणी येथील दिया, मोर्शी येथील हिवरखेड, नांदगाव खंडेश्वर येथील लोणी, तिवसा येथील मोझरी, वरुड येथील जरुड व लोणी तसेच चिखलदार तालुक्यातील टेंभूरसोडा येथे कौशल्य केंद्रे आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

जुना धामणगावचे सरपंच विश्वेश्वर दिघाडे, धामणगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र चांडक, तहसीलदार गोविंद वाकोडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, ग्रामविकास अधिकारी आर.बी. आहेरवार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक रोहित मुंढे आदी उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तसेच महाविद्यालयांचे विद्यार्थी, गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news