मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कारा येथील एका युवकाला वाघाने हल्ला करून फरफटत दरीत ओढून नेले. घटनास्थळी युवकाचा मोबाईल, पँन्ट, रक्ताचे शिंतोडे पडलेले आहेत. राजेश रतिराम कास्देकर ( वय २८) असे वाघाने फरफटत नेलेल्या युवकाचे नाव आहे. निस्ताराचे बांबू तोडण्यासाठी कारा येथील तिन मजूर माताकोल संरक्षण कॅप परिसरात गेले होते. अचानक आज सकाळी त्यांच्यावर वाघाने हल्ला चढविला व राजेशला उचलून दरीत ओढून नेले. भुरेलाल कास्देकर, सुखलाल धांडे हे घाबरून एका झाडावर चढल्यामुळे त्यांचा जिव वाचला. घटनास्थळी राजेशच्या रक्ताचे सडा पडलेला होता. गुगामल वन्यजीव विभागात मोठ मोठ्या दरी आहेत. त्या दरीत राजेशला ओढत नेल्याने त्याचा मृतदेह वुत्त लिहिस्तोवर मिळालेला नाही. वन्यजीवांच्या हल्ला करण्याच्या घटनेत अलिकडच्या काळात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे जंगलातील आदिवासी भयभीत झाले आहे. रक्ताचा जंगलात पडलेल्या सड्यांच्या आधारे व्याघ्र प्रकल्पाचे पथक राजेशच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. हे पथक जंगलात तळ ठोकून आहे. गेल्या दोन तिन वर्षात वाघाच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे. वन्यजीवांनी जंगलातील शेतकऱ्यांना हैराण करून सरकारची सोडलेले आहे. हे हल्ले रोखण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाकडून उपाययोजना करण्याची गरज आहे.