अमरावती: दत्तापूर खरेदी विक्री संस्थेवर काँग्रेसचे वर्चस्व

अमरावती: दत्तापूर खरेदी विक्री संस्थेवर काँग्रेसचे वर्चस्व
Published on
Updated on

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर धामणगाव खरेदी विक्री सहकारी संस्थेवर काँग्रेसच्या शेतकरी सहकारी गटाने सत्ता अबाधित ठेवली. काँग्रेसने सर्व १५ जागेवर विजय मिळवला. रविवारी मतदान झाले. तर आज (दि.२६) मतमोजणी झाली. १५ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूकीत माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांचे शेतकरी सहकारी पॅनल व आमदार प्रताप अडसड व अमरावती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय भैसे, भाजप व मित्रपक्षांचे परिवर्तन पॅनल एकमेकांसमोर उभे होते.

एकूण ३१ मतदारांमधून प्रथम क्रमांकाची मते मिळविलेल्या ७ उमेदवारांचा विजय झाला. यामध्ये संकेत अरुण उभाड २५ मते, मुकेश गुलाबचंद राठी व मनोज रामभाऊ वेरुळकर या दोघांना २४ मते, सुरेंद्र भैय्यालाल जयस्वाल व बबनराव बापुराव मांडवगणे २३ मते, सुनील देविदास भोगे व भगवान उत्तमसा शिंदे यांना २१ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला.

विरोधातील परिवर्तन पॅनलच्या तीन उमेदवारांपैकी दुर्गाबक्षसिंह रामप्रतापसिंह ठाकुर १० व राहुल देविदास झोपाटे ५ तर बंडू मोतीराम सहारे यांना ५ मतांवर समाधान मानावे लागले. सर्वसाधारण सभासद मतदारसंघातून सुरेश भाऊराव जाधव यांना ८७१ मते, नरेंद्र महादेवराव पाचबुधे ७८० मते व प्रदीप रतनलाल मुंधडा ८२८ प्राप्त झाली. पहिल्या पसंतीने तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. जितेंद्र दिगंबरराव कडु, ब्रिजपालसिंग इंद्रपालसिंग ठाकूर, राहुल बाळासाहेब राऊत यांचा पराभव झाला.

इतर मागास वर्ग मतदारसंघातून हेमंत गुणवंतराव कडू यांना ८८२ मते पडून ते विजयी झाले. तर विजय केशवराव कोंबे यांचा पराभव झाला. अनुसुचित जाती, जमाती मतदार संघातून भाऊराव बाबाराव अडकणे यांना ९५४ मिळून विजय झाला. तर निरंजन सिताराम गुजर यांचा पराभव झाला.

तसेच वि.ज/भ.ज./वि.मा.प्र मतदार संघातून मधुकर जागोबाजी सावलकर ९६० मिळवून विजयी झाले. विशाल नामदेवराव बमनोटे हे पराजित झाले. महिला राखीव मतदार संघातून शालिनी रमेशराव कोंबे ९६९ मते व मालती अशोक पावडे ९४२ मते प्राप्त करून विजयी झाल्या. मिना विलास वर्गणे, पुष्पा पद्माकर वर्गणे यांना पराभव स्वीकारावा लागला. मतमोजणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक गजानन डावरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विनोद वरकड यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news