

अकोला : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर् येथील बायपासवरील वाईनबार मालकाने उधारिचे बिल मागितल्यावर युवकाने चक्क वाईन बारच्या काऊंटरला पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत बार मालकाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना (रविवार) सायंकाळी घडली.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिंजर बायपासवर जयस्वाल वाईनबार आहे. या वाईनबारची उधारी रामा वानखडे नामक युवकाकडे होती. बार मालकाने त्याच्याकडे उधारी मागितली म्हणून युवकाचा राग अनावर झाला. त्या युवकाने पेट्रोल आणून काउंटरवर फेकले व काउंटर पेटवून दिले. या घटनेत दारूच्या काही बाटल्या आणि गल्ल्यातील रोख रक्कम जळून खाक् झाली आहे.
या प्रकरणी वाईन बारचे मालक अंकित जयस्वाल यांनी पिंजर पोलिसात रविवारी सायंकाळी तक्रार दाखल केली, त्यांच्या तक्रारीवरून रामा वानखडे विरुद्ध पिंजर् पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.