अकोला - भारत जोडो अभियानचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या लोकशाहीची सुरक्षा व आपलं मत या विचार सभेत आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगला गोंधळ घालत ही सभा बंद पाडली. यावेळी खुर्च्या फेकण्यात आल्या, घोषणाबाजी करण्यात आली. (Akola News )
अकोला शहरातील आकाशवाणी समोरील जि. प. कर्मचारी भवन सभागृह येथे आज लोकशाहीची सुरक्षा व आपल मत या विषयावर विचार सभा आयोजित करण्यात आली होती. भारत जोडो अभियानचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत ही सभा बंद पाडली. या वेळी मंचावर योगेंद्र यादव यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. खुर्च्या फेकण्यात आल्या. घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी यादव यांना या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी नेले होते. (Akola News )