

अकोला : बाळापूर तालुक्यातील हाता येथील महिला शेतात कापूस वेचत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने एक महिला जखमी झाली. ही घटना रविवारी (दि.१६) सकाळी घडली. अर्चना राजेश वानखडे (वय ३२) असे या महिलेचे नाव आहे. शेगाव येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले.