'स्व.तुकाराम बिडकर सच्चे कार्यकर्ते व खंबीर लोकनेते'; उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. बिडकर यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन
Akola News
'स्व.तुकाराम बिडकर सच्चे कार्यकर्ते व खंबीर लोकनेते'; उपमुख्यमंत्री अजित पवारPudhari Photo
Published on
Updated on

अकोला: विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार स्व. तुकाराम बिडकर यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात मोठे कार्य आहे. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व, लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणारे सच्चे कार्यकर्ते व खंबीर लोकनेते होते, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. बिडकर यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री  पवार यांनी स्व. बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली व सांत्वन केले. यावेळी खासदार सुनील तटकरे ,आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार अमोल मिटकरी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news