अकोला येथे दुचाकी झाडाला धडकल्याने शिक्षकाचा मृत्यू

Akola Accident News | अडगांव बु. येथील उमरा फाट्यानजीक अपघात
teacher death
उमरा फाट्यानजीक अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला. (File Photo)
Published on
Updated on

अकोला : तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक सुभाष ढोकणे (वय 49) यांचा दुचाकीने आपल्या गावी जात असताना 14 ऑक्टोबररोजी उमरा फाट्यानजीक अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहिती नुसार, कामानिमित्त ते १४ ऑक्टोबरला अकोट शहरात गेले होते. तिथून परत येताना रात्री 10. 30 च्या दरम्यान उमरा फाट्यानजीक त्यांची दुचाकी रस्त्यालगत पडलेल्या झाडाला धडकली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून त्यांचे जागेवरच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news