अकोल्यातून ४ लाखांची बॅग पळविणारा पुण्यात जेरबंद

Akola News | आठ महिन्यांनंतर चोरट्याला पकडण्यात यश
Akola Crime News
अकोल्यातून ४ लाखांची बॅग पळविणाऱ्या चोरट्याला पुण्यात अटक केली आहे. File Photo
Published on
Updated on

अकोला: पुढारी वृत्तसेवा : शहरातील लोणी रोडवरील किराणा मार्केटमधून चार लाखांची बॅग दोन अज्ञात चोरट्यांनी सिनेस्टाइल लंपास केल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हेगाराला पिंपरी- चिंचवड येथून अटक केली आहे.

आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत (वय ३२, रा. विद्यानगर, झोपडपट्टी, आयशा मशीदमागे चिंचवड, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार, तक्रारकर्ते शुभम संजय बेहरे किराणा साहित्य खरेदीसाठी या मार्केट मध्ये आले होते. त्यांच्याकडील ४ लाखांची बॅग टाटा एस गाडीला मागील बाजूने अडकवलेली होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ही बॅग लंपास केली.

याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. अखेर आठ महिन्यांनंतर त्याला राहत्या घरून पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचे इतर दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Akola Crime News
अकोला | जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 8 हजार 91 प्रकरणे निकाली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news